Recent Topic

10/recent/ticker-posts

राहुल-प्रियंकाला हाथरसात जाण्यापासून रोखलं. गाव बनले पोलिसांची छावणी

 

 संपूर्ण प्रकरण काय आहे?

14 सप्टेंबर रोजी हाथरस जिल्ह्यातील चांदपा या गावात 4 जणांनी 19 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी महिलेचा कणा तोडला आणि तिची जीभ देखील कापली. नंतर पीडितेचा दिल्लीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. परंतु प्रकरण क्षमायचे नाव घेत नाहीये, कारण पीडितेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी रात्रीच्या अंधारात पीडितेचा मृतदेह, घरातील लोलांना त्यांच्याच घराला कोंडून एकट्याने  जाळला.

हे सार संशयास्पद आहे.

पोलिस पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करीत होते? कि अजून काही यात शंका आहे.

किंवा, सरकारच्या दबावाखाली असलेल्या एखाद्याला वाचवण्यासाठी?

खाली राहुल गांधी पोलिसांपासून पळून हाथरसात कसे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत ते पहा.

         

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या मृत्यूच्या प्रकरणात राजकारण तीव्र झाले आहे. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी आणि राहुल गांधी आज हाथरसात जात आहेत. पोलिसांनी त्यांना ग्रेटर नोएडा येथे रोखले तेव्हा ते दोघेही कारमधून खाली उतरले आणि ते पायीच पुढे गेले. ग्रेटर नोएडापासून हाथरस 142 किलोमीटरवर आहे. दरम्यान, हाथरस प्रशासनाने 31 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कलम 144 लागू केली. हाथरसच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. पीडितेच्या कुटूंबाच्या गावात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

राहुल-प्रियंका येण्यापूर्वी समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते पीडित मुलीच्या गावात पोहोचले, परंतु पोलिसांनी त्यांना बंदी घातली आणि त्यांना गावात प्रवेश करण्यापासून रोखले. याचा निषेध म्हणून सपा कार्यकर्त्यांनी धरणे लावून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली.

हाथरसचे एसपी विक्रांत वीर म्हणाले आहेत की अलीगड रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात पीडितेच्या शरीरावर जखमांचा उल्लेख आहे, परंतु बलात्काराची पुष्टी झालेली नाही. फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच हे सांगता येईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.


 इतर संबंधित कायदे विषयक माहिती - 

१) जर पोलीसांनी अटक केली तर, तुम्हाला तुमचे हे अधिकार माहित असावेत

२) जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात, तर कागदपत्रांची हि माहिती तुमच्या जवळ असलीच पाहिजे

३) वृद्ध व अपंगांसाठी गृहांसाठी आवश्यक कागदपत्रे  

४) कन्यादान योजनेखाली नवदाम्पत्यांना अर्थसहाय्य साठी आवश्यक कागदपत्रे

५) लहान व मध्यम व्यवसायासाठी मुदत कर्जसाठी आवश्यक कागदपत्रे  

६) अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवलसाठी आवश्यक कागदपत्रे  


Subscribe us - 

Enter your email address:





Delivered by FeedBurner
Join our social group on - 

THANK YOU


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();