कायद्याचे ज्ञान ह्या ब्लॉग दरम्यान आज तुम्हाला पोलिसांनी तुम्हाला किवा तुमच्या परिचयातील व्यक्ती ला जर अटक झाली तर तुम्हाला तुमचे हे ज्ञायिक अधिकार माहित असायला हवेत.
सामान्य लोकांना पोलिसांची जरा भितीतच असते, ह्या साठी जर तुम्हाला हे अधिकार माहित असले तर तुम्ही हि जागरूक होऊन त्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकाल,
तर मित्रांनो तुम्हाला तुमचे हे अधिकार माहित च असायला हवेत, हे अधिकार खालील प्रकारे आहेत.
१) अटक झालेल्या कोणत्याही व्यक्तीस, अशा अटकेची कारणे, शक्य तितक्या लवकर तिला कळवल्याशिवाय, हवालातीत स्थानबद्ध करण्यात येणार नाही किंवा आपल्या पसंतीच्या वकिलाचा विचार घेण्याचा, सल्ला घेण्याचा व त्याच्याकरवी बचाव करण्याचा हक्क तिला नाकारला जाणार नाही.
२) जिला अटक केली आहे अश्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना, हितचिंतकांना किवा मित्रांना पोलिसांनी त्वरित संपर्क करून, त्यांना ताब्यात घेतलेली जागा आणि कोठडीची जागा ह्याची माहिती द्यावी. ( ह्यासाठी पोलिसांनी कोणतेही संपर्काचे माध्यम वापरावे)
३) जिला अटक केली आहे व हवालातीत स्थानबद्ध केले आहे अशा प्रत्येक व्यक्तीला, अटकेच्या ठिकाणापासून सर्वात जवळच्या दंडाधिका-याच्या न्यायालयापर्यंतच्या प्रवासास आवश्यक असलेला अवधी वगळून अशा अटकेपासून चोवीस तासांच्या कालावधीत त्या दंडाधिका-यापुढे हजर केले जाईल आणि अशा कोणत्याही व्यक्तीला दंडाधिका याने प्राधिकृत केल्याशिवाय, उक्त कालावधीनंतर अधिक काळ हवालातीत स्थानबद्ध करण्यात येणार नाही.
४) अटकेच्या वेळी अटकेचा मेमो तयार केलाच पाहिजे, त्यात अटकेची वेळ व तारीख, ह्याच सोबत घटनेची माहिती दिलेल्या व्यक्तीचे नाव, अटक करणाऱ्या पोलिसाचे नाव ह्याचा उल्लेख असायलाच हवा व कमीतकमी एखाद्या साक्षीदाराने त्यास प्रमाणित केले पाहिजे. साक्षीदार एकतर कुटुंबातील सदस्य असू शकतात, किंवा समाजातील कोणतीही आदरणीय व्यक्ती असू शकतात, सदरच्या मेमो ची एक प्रत अटक झालेल्या व्यक्तीला द्यायलाच हवी.
५) अटक करण्यात आलेली व्यक्ती त्या वेळी शारीरिक तपासणीची विनंती करू शकते, अटकेच्या वेळी किरकोळ आणि मोठ्या जखमांची नोंद झाली असल्यास. अटक केलेल्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी एखाद्या पात्र वैद्यकीय सरकारी अधिकार्याने केली पाहिजे.
६) अटक केलेल्या व्यक्तीस चौकशी दरम्यान वकिलाला भेटण्याचा हक्क आहे.
७) पोलिस कोठडीत केल्या गेलेल्या कबुलीजबाबांचा उपयोग आरोपीविरूद्ध पुरावा म्हणून करता येणार नाही.
८) 15 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलास आणि महिलांना एकट्याने पोलिस स्टेशनमध्ये बोलावले जाऊ शकत नाही.
९) पोलीस कोणत्याही महिलेला रात्री सहा वाजे नंतर कोणत्याही कारणाने अटक किंवा पोलीसठाण्यात बोलावू शकत नाहीत.
१०) कोणत्याही महिलेची अटक महिला पोलीसच करू शकते, व कोणतीही चौकशी महिला पोलीसच्या साक्षीतच करायला हवी.
या सोबतच अजून हि काही अधिकार आहेत ते लोकांनी जाणून घ्यायला हवेत.
१) कोणत्याही व्यक्तीला फक्त कायद्याचे उल्लंघन केल्यावरच अटक होऊ शकते, पोलीस कुणाचीही विना कारण अटक करू शकत नाही.
२) कोणत्याही व्यक्तीला एका गुन्ह्यासाठी एकदाच शिक्षा होऊ शकते.
३) कोणतीही व्यक्तीचा स्वता बद्दलच केलेला कबुली जवाब वा साक्ष ग्राह्य ठरणार नाही.
४) अटक झालेल्या व्यक्तीला पोलीस किवा कोर्ट समोर शांत राहण्याचा व उत्तर न देत मूक राहण्याचा अधिकार आहे.
५) अटक झालेल्या व्यक्तीने पोलीसांन समोर दिलेला कबुली जवाब हा गृहीत नसतो.
६) अटक झाल्याची कारण जाणण्याचा अधिकार.
७) वकील मिळण्याचा अधिकार.
८) पोलीस अटक झालेल्या व्यक्तीला २४ तासांपेक्षा जास्त पोलिस ठाण्यात ठेऊ शकत नाहीत, अटक झालेल्या व्यक्तीला जवळच्या दंडाधिका-याच्या समोर हजर करणे आवश्यक आहे.
९) अटक झालेल्या व्यक्तीच्या हितचिंतकांना अटकेची माहिती देण्याचा अधिकार.
१०) कायद्याची मदत, योग्य व जलद कारवाई मिळण्याचा अधिकार.
लेखक
ॲड. मयुर अमरसिंग वळवी
(लेखक मुंबई येथे अधिवक्ता आहेत )
इतर संबंधित कायदे विषयक माहिती -
१) जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात, तर कागदपत्रांची हि माहिती तुमच्या जवळ असलीच पाहिजे
२) वृद्ध व अपंगांसाठी गृहांसाठी आवश्यक कागदपत्रे
३) कन्यादान योजनेखाली नवदाम्पत्यांना अर्थसहाय्य साठी आवश्यक कागदपत्रे
४) लहान व मध्यम व्यवसायासाठी मुदत कर्जसाठी आवश्यक कागदपत्रे
५) अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवलसाठी आवश्यक कागदपत्रे
कोणत्याही कायदे विषयक मदत व प्रश्नांसाठी तुम्ही तेथे WhatsApp करू शकता.
घाबरण्याचे कारण नाही, तुमचा प्रश्न तुम्ही रेकॉर्ड करूनही पाठवू शकता, तुम्हाला ह्याची नक्कीच मदत होईल.
जर तुम्हाला आपचा हा प्रयत्न आडवला असेल तर तुमच्या हितचिंतकांना देखील हा मेसेज शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांना अवघड काळात मदत करू शकतो.
(टीप - जी व्यक्ती त्यावेळी शत्रूदेशीय असेल अशा कोणत्याही व्यक्तीला किंवा, ज्या व्यक्तीला प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद करणा-या कोणत्याही कायद्याखाली अटक केली आहे किंवा स्थानबद्ध केले आहे अशा कोणत्याही व्यक्तीला, खंड (१), (२) व (३) यातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.)
0 टिप्पण्या