Source - Bharskar |
कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणादरम्यान केंद्र सरकारने संकेत दिले आहेत की, हाय-रिस्क ग्रुप म्हणजेच वृद्ध आणि फ्रंटलाइन हेल्थ वर्कर्ससाठी कोरोना व्हॅक्सीनला लवकर अप्रुव्ह केले जाईल. अद्याप व्हॅक्सीन येण्याची कोणतीच तारीख सांगितली नाही, तरीदेखील आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी मार्च 2021 पर्यंत व्हॅक्सीन उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. दरम्यान, अमेरिकन कंपनी फाइजरने दावा केला आहे की, त्यांची व्हॅक्सीन यावर्षी डिसेंबरपूर्वी अमेरिकन बाजारात उपलब्ध केली जाईल.
0 टिप्पण्या