Source - Bharskar |
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सोशल मीडियावर संडे संवाद कार्यक्रमात म्हटले की, सरकार हायरिस्क ग्रुप्स म्हणजेच वृद्ध आणि फ्रंटलाइन हेल्थ वर्कर्ससाठी लवकरच व्हॅक्सीनला मंजुरी देऊ शकते. यावर सर्वांना राजी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.हर्षवर्धन यांच्या बोलण्यावरुन स्पष्ट संकेत मिळत आहेत की, रशिया आणि चीनप्रमाणेच भारतात व्हॅक्सीनला लवकर अप्रुव्ह करुन हाय रिस्क ग्रुप्ससाठी उपलब्ध केले जाऊ शकते.
रशियाने आपल्या SPUTNIK V आणि चीनने आपल्या तीन व्हॅक्सीनला इमरजेंसी अप्रूव्हल दिले आहे. भारतातही तीन व्हॅक्सीनच्या चाचण्या सुरू आहेत. भारत बायोटेक आणि आयसीएमआर कोव्हॅक्सिन विकसीत करत आहेत. अहमदाबादची कंपनी जायडस कॅडीलाचे व्हॅक्सीन फेज-2 मध्ये आहे. तसेच, पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफोर्ड/एस्ट्राजेनेकाच्या कोवीशील्ड व्हॅक्सीनच्या फेज-2 आणि फेज-3 ट्रायल्सवर आहे.
0 टिप्पण्या