दररोजच्या व्यवहारात आणि ATMमध्ये 2 हजारांच्या नोटा कमी प्रमाणात दिसत असल्याने त्या बंद होणार अशी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. यावर सरकारने संसदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
या संबंधात लोकसभेत आज प्रश्न विचारण्यात आला होता. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यावर उत्तर दिलं. 2 हजारांच्या नोटींची छपाई बंद करण्याचा कुठलाही विचार नाही. सरकार RBIच्या शिफारशीनुसार त्याबाबत निर्णय घेते असं त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या संकटामुळे नोटांची छपाई कारखाण्यांमध्ये काही दिवस बंद होती अशी माहितीही त्यांनी दिली.
31 मार्च 2020 पर्यंत 2000 रुपयांच्या 27,398 लाख नोटा वापरात होत्या. तर मार्च 2019 मध्ये 32,910 लाख नोटा वापरात होत्या. 2018च्या डिसेंबर महिन्यात 2,000च्या नोटांची संख्या 33,632 लाख एवढी होती. व्यवहारात जास्त किंमतीच्या नोटा नसाव्यात असं म्हटलं जातं. अशा नोटा असल्या तर काळापैसा जास्त साठवला जातो असं म्हटलं जातं.
0 टिप्पण्या