Recent Topic

10/recent/ticker-posts

पण, तु नाही परतली !!

 

पण,  तु नाही परतली !!

पण,  तु नाही परतली !!


जीवनात आता हसतांना ....रडतांना ....उठतांना....बसतांना..
भावना माझ्या जपतांना ,
तुझी फार गरज होती ,
पण ,
तु नाही परतली !!१!!


शब्द आता काही एकांतात मांडतांना ,
तुझ्यासाठी कवितेत सजवतांना ......
ओळीत रुजवतांना ...
तुझी फार गरज होती ,
पण ,
तु नाही परतली !!२!!


एकांतात आता तुझ्यासाठी रडतांना ,
फक्त कुस बदलत अश्रु माझे पुसतांना,
ओल्या राती काढतांना .........
तुझ्या आधाराची फार गरज होती ,
पण ,
तु नाही परतली !!३!!


आता काही क्षणाचच आयुष्य बाकी असतांना ,
आक्रोश करत विरहाचे दुख पेलतांना .......
मरणा न्ंतर सरनावर जळतांना ,
फक्त एकदाच तुला ......
फक्त एकदाच तुला ,
पहाण्याची फार गरज होती .......
पण ,
तु नाही परतली !!१!!


yur valavi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();