Recent Topic

10/recent/ticker-posts

सरले असेच वर्ष !!

सरले असेच वर्ष नि कितेक महिने तरी तुझी ओढ कायम आहे ,
सगळे म्हणालेत विसर रे आता तरी तिला ........




सरले असेच वर्ष !!   



सरले असेच वर्ष नि कितेक महिने तरी तुझी ओढ कायम आहे ,
सगळे म्हणालेत विसर रे आता तरी तिला ........
पण ,
तरी मन आज हि तिच्या वरच घायाळ आहे !!


तु गेल्यावर एक क्षण हि वर्षा सारखाच आहे ,
पुन्हा नव्याने तोच एकांत आणि तोच विरह कायम आहे !!

"" माझं तुझ्यावर प्रेम आहे "
हे सांगण्यासाठी तरी तुला समोर एकदा भेटायच आहे .....

उत्त्तर ओठांवरुन नाही आल ,
तरी मला अपेक्षित तुला शेवटल्यांदा भेटनच आहे !!

नाही तर आठवण आणि फक्त आठवण हेच या वर्षी हि कायम आहे ,
सगळे म्हणालेत विसर रे आता तरी तिला ........
पण ,
तरी मन आज हि तिच्या वरच घायाळ आहे !!


भेटशिल ना गं या वर्षी मला ?
ला नाही तर ला तरि ,
पुन्हा नव्याने सुरुवात करु नि नवे स्वप्न पाहु ,
एकंदरित तुला शेवटल्यआंदा पाहिलेल आठवत हि नाही ,
नाही तरी.......
पुन्हा ,
तुला न भेटनही या वर्षी कायम आहे ......

सगळे म्हणालेत विसर रे आता तरी तिला ........
पण ,
तरी मन आज हि तिच्या वरच घायाळ आहे !!


तु जाणार्या प्रत्येक वाटांवर ,नजर पुन्हा आता भिरकायला लागली आहे ,
तु आता भेटशिल नक्कीच हि खोटी का होईना पण मनाला आशा भिडली आहे !!

तु भेटल्यावर देण्यासाठी घेतलेली भेट आज हि जपुन आहे ,
तिहि माझ्या राजकुमारीच्या भेटीसाठी आतुर आहे !!

नव वर्ष अपेक्षा तुझ्या भेटीच्या घेउन आलय ,
तुला भेटुन सर्व काही मनातल सांगण हेच मात्र जुन आहे !!

उगाच मनातल मनात ठेवनही काही बर नाही ,
तु हि होच म्हणाव हि माझी अपेक्षा हि नाही ,
फक्त तु मला समजाव हेच भाग्यात असण खुप आहे !!


खुष रहा आयुष्यात हिच् तर माझी हि अपेक्षा आहे.....
कधी भेटलीच आयुष्यात तर ओळख देशील हिच एक आशा आहे ,
नाहीच भेटली तर हा एकांत कायम आहे !!


मग पुन्हा म्हणत बसेन ,
सरले असेच वर्ष नि कितेक महिने तरी तुझी ओढ कायम आहे ,
सगळे म्हणालेत विसर रे आता तरी तिला ........
पण ,
तरी मन आज हि तिच्या वरच घायाळ आहे !!



yur valavi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();