अमेरिकेच्या तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, अलीकडील दिवसांमध्ये व्हाईट हाऊस आणि काही विभागांना रिझिन्स नावाच्या घातक रसायनांचा समावेश असलेले लिफाफे पाठवले गेले. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की- काही अन्य धोकादायक रासायनिक लिफाफेही व्हाईट हाऊस किंवा इतर विभागांकडे पाठविण्यात आले आहेत की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत. हा डावपेच रचण्यासाठी स्थानिक टपाल यंत्रणेचा वापर केल्याचे अधिकाऱ्यांना वाटत आहे.
न्यूयॉर्क टाइम्सनुसार, तपास यंत्रणेला संशय आहे की, हे लिफाफे कॅनडावरुन पाठवण्यात आली आहेत. एका महिलेवर यंत्रणेला संशय आहे. तिचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही.
0 टिप्पण्या