Illustration by James Bareham / The Verge |
(Facebook) विविध गोष्टींमुळे चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून फेसबुकच्या युजर्सची अकाउंट हॅक होत असल्याचे आणि त्यांच्या डेटा गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता फेसबुकमध्ये पूर्वी काम करणाऱ्या एका महिलेने खळबळजनक खुलासा करणारा मेमो शेअर केला आहे. फेसबुकच्या माजी डेटा सायंटिस्ट असलेल्या कर्मचाऱ्याने Facebook च्या माध्यमातून लोक राजकीय अजेंडा राबवतात, तो कशाप्रकारे यशस्वी होतो, याचा लेखाजोखा मांडला आहे.
डेटा सायंटिस्ट म्हणून पूर्वी फेसबुकमध्येच काम करणाऱ्या सोफी जेंग यांनी फेसबुकच्या माध्यमातून लोकांची कशी दिशाभूल केली जाते, यासंदर्भात एक नोट लिहिली आहे. निवडणुकांदरम्यान आपापल्या फायद्यासाठी आणि जनमत तयार करण्यासाठी रीतसर फेसबुकचा कसा वापर होतो, यावर सोफी यांच्या नोटमुळे प्रकाश पडला आहे. भारतातही हे प्रकार होतात, असं सोफी यांनी लिहिलं आहे.
0 टिप्पण्या